मुंबई: विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी लातूर जिल्ह्यातील उजळंब ते रोहीणा मार्गावरील कामे अग्रक्रमाने करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्या मार्गावरील कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे तसेच याचा पहिला टप्पा येत्या ३१ मार्च पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.
विधानसभा सदस्य बाळासाहेब पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात लातूर जिल्ह्यातील उजळंब ते रोहिणा मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी त्याला प्रत्युत्तर देताना अशोक चव्हाण म्हणाले, रस्त्याचे काम सुरु होते पण कोरोनामुळे कामाची गती कमी झाली होती, मात्र आता अग्रक्रमाने हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या कामाची गुणवत्ता राखण्यासाठी त्याची दक्षता व गुणवत्ता नियंत्रण पथकाकडून पाहणी केली जाईल त्यानंतर कामची देयके दिली जातील. तसेच ३१ मार्च पर्यंत या कामाचा पहिला टप्पा पूर्ण होईल, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
राज्याच्या अर्थसंकल्पात नांदेड ते जालना या द्रुतगती जोड महामार्गाच्या कामासाठी ७ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाले तर नांदेड थेट समृद्धी महामार्गाशी जोडला जाऊ शकतो, यामुळे नांदेडकरांचे दळणवळण सुलभ होऊ शकते. अशोक चव्हाण यांनी नांदेड शहराला महामार्गाशी जोडण्याचा पुढाकार घेतला आहे. चव्हाण यांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- सत्तेच्या पदापेक्षा रिपब्लिकन योद्धा हा सन्मान महत्वाचा – रामदास आठवले
- ‘या’ कारणामुळे घाटीत कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू
- ‘देवेंद्रजींना पुन्हा यावचं लागेल, अजितदादा तुम्ही पण या…’ भाजप नेत्याची विधानसभेतच ‘पुन्हा’ साद
- वय वर्षे ५७, ‘हा’ अभिनेता नवरोबा म्हणून पाचव्यांदा बसला घोड्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

