Share

‘देवेंद्रजींना पुन्हा यावचं लागेल, अजितदादा तुम्ही पण या…’ भाजप नेत्याची विधानसभेतच ‘पुन्हा’ साद

Published On: 

मुंबई : आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्यासाठी भाजपने मोर्चे बांधणी केली होती. अखेरच्या दिवशी देखील भाजपने कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहे.

भाजप नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर प्रहार करताना, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा यावचं लागेल असं सांगतानाच काही दिवसांसाठी झालेल्या ‘त्या’ मैत्रीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा साद घातली आहे.

‘मला प्रश्न पडला आहे की, अजितदादा तुमच्यावर टीका करायची का नाही. कारण पुन्हा तुम्ही कधी मित्र व्हाल. महाराष्ट्र वाचवण्यासाठी जी ताकद लावायची ती लावा, देवेंद्रजी तुम्हाला पुन्हा यावंच लागेल. अजितदादा तुम्ही पण या हरकत नाही,’ अशी ऑफर मुनगंटीवार यांनी विधानसभेत बोलताना दिली आहे. ‘आम्ही वैधानिक मंडळांचा आग्रह करत होतो. आमची कवचकुंडलं काढली. विदर्भ आणि मराठवाड्याचा 1 टक्के निधी कमी केला. दादा तुम्ही अधिकाऱ्यांवर विसंबून राहू नका,’ असा टोला देखील मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

अनिल देशमुख यांच्यावर हक्कभंग तर अशोक चव्हाणांना…

दरम्यान, अन्वय नाईक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधानसभेत केला होता. यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केला आहे. तर, मराठा आरक्षणावर दिशाभूल करणारे निवेदन केल्याबद्दल मंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात सुद्धा त्यांनी हक्कभंगाची नोटीस दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!