मुंबई : आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. अखेरच्या दिवशी देखील भाजपने कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत तुफान टोलेबाजी करत महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं.
‘कुछ देर की खामोशी है, फिरसे शोर आयेगा, तीन महिने की दूरी है, फिरसे हमारा दौर आयेगा’ अशी शायरी करत मुनगंटीवार यांनी सूचक इशारा दिला आहे. दरम्यान, मुनगंटीवारांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यांनी जगजितसिंह यांची प्रसिद्ध गझलीचा आधार घेत मुनगंटीवार यांना चिमटा काढला आहे.
‘देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री होते. ते विदर्भाचे, नागपूरचे होते हा आनंद आहे. पण सुधीरभाऊ तुम्ही देवेंद्रभाऊंपेक्षा किती सिनियर होता. तुमचं दुःख पाहून मला जगजितसिंह यांची गझल आठवतेय. सुधीरभाऊ तुम इतना क्यू मुस्करा रहे हो ? क्या गम है जो छुपा रहे हो…आखो में नमी, हसी लबो पें मतलब झुटीं हसी लबो पें ! क्या हाल हे, क्या दिखा रहो हो,’ असा टोला देशमुखांनी लागवताच सभागृहात हशा पिकला होता.
‘आता तुम्ही महाराष्ट्राचे पप्पू होऊ नका !’
‘आम्ही वैधानिक मंडळांचा आग्रह करत होतो. मात्र आमची कवचकुंडलं काढली. विदर्भ आणि मराठवाड्याचा 1 टक्के निधी कमी केला. दादा तुम्ही अधिकाऱ्यांवर विसंबून राहू नका’ असा टोला मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे हे मध्येच बोलायला उभे राहिले असता ‘आता तुम्ही महाराष्ट्राचे पप्पू होऊ नका’ अशी बोचरी टिप्पणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- सत्तेच्या पदापेक्षा रिपब्लिकन योद्धा हा सन्मान महत्वाचा – रामदास आठवले
- विरोधकांच्या रोषानंतर सचिन वाझेंची बदली होणार; गृहमंत्र्यांनी केली घोषणा !
- आता तुम्ही महाराष्ट्राचे पप्पू होऊ नका; मुनगंटीवारांचा पटोलेंना मिश्किल टोला
- अपघातांचे प्रमाण वाढल्यानंतर शासनाला जाग, घेतला ‘हा’ निर्णय
- ‘देवेंद्रजींना पुन्हा यावचं लागेल, अजितदादा तुम्ही पण या…’ भाजप नेत्याची विधानसभेतच ‘पुन्हा’ साद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

