🕒 1 min read
मुंबई : आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्यासाठी भाजपने मोर्चे बांधणी केली होती. तर, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके आढळलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू मागील गूढ वाढत आहे. हिरेन यांच्या पत्नीने शिवसेनेशी पूर्वसंबंध असलेल्या पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
त्यामुळे सचिन वाझेंवर कारवाई करण्याऐवजी सरकार त्यांना पाठीशी घालतंय असा आरोप करत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. यावरून काल विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक काल एकमेकांना भिडले आणि सभागृह अनेकदा तहकूब देखील करावं लागलं.
आता संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात येणार आहे. गृहंमत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत घोषणा केली आहे. दरम्यान, आज देखील विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली आहे. अन्यथा जे मुबलक पुरावे आहेत, ते पुरावे वाझे नष्ट करतील अशी शक्यता असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार नाराज ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
- महंगाई की मार! पेट्रोल-डिझेल नंतर आता खत ही महागले
- सव्वीस कोटींच्या ठेवी बुडवणारा चेअरमन अखेर शरण
- फडणवीसांचा आक्रमक पवित्रा; अशोक चव्हाणांना नोटीस तर देशमुखांवर हक्कभंग
- हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्या प्रकरणी शर्जिलला कोर्टाचा दिलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
