मुंबई : आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्यासाठी भाजपने मोर्चे बांधणी केली होती. अखेरच्या दिवशी देखील भाजपने कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहे.
भाजप नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत तुफान टोलेबाजी करत महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं. अखेरच्या दिवशी देखील त्यांनी पुन्हा एकदा विदर्भ आणि मराठवाड्याच्या वैधानिक मंडळाच्या मागणीकडे राज्य सरकारचं लक्ष वेधलं आहे.
‘आम्ही वैधानिक मंडळांचा आग्रह करत होतो. मात्र आमची कवचकुंडलं काढली. विदर्भ आणि मराठवाड्याचा 1 टक्के निधी कमी केला. दादा तुम्ही अधिकाऱ्यांवर विसंबून राहू नका’ असा टोला मुनगंटीवार यांनी अजित पवार यांना लगावला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे हे मध्येच बोलायला उभे राहिले असता ‘आता तुम्ही महाराष्ट्राचे पप्पू होऊ नका’ असा मिश्किल टोला मुनगंटीवार यांनी पेटोलेंना लगावला.
‘अजितदादा तुमच्यावर टीका करायची की नाही ? कारण पुन्हा तुम्ही आमचे मित्र व्हाल !’
‘मला प्रश्न पडला आहे की, अजितदादा तुमच्यावर टीका करायची का नाही. कारण पुन्हा तुम्ही कधी मित्र व्हाल. महाराष्ट्र वाचवण्यासाठी जी ताकद लावायची ती लावा, देवेंद्रजी तुम्हाला पुन्हा यावंच लागेल. अजितदादा तुम्ही पण या हरकत नाही,’ अशी ऑफर मुनगंटीवार यांनी विधानसभेत बोलताना दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सत्तेच्या पदापेक्षा रिपब्लिकन योद्धा हा सन्मान महत्वाचा – रामदास आठवले
- विरोधकांच्या रोषानंतर सचिन वाझेंची बदली होणार; गृहमंत्र्यांनी केली घोषणा !
- वय वर्षे ५७, ‘हा’ अभिनेता नवरोबा म्हणून पाचव्यांदा बसला घोड्यावर
- फडणवीसांचा आक्रमक पवित्रा; अशोक चव्हाणांना नोटीस तर देशमुखांवर हक्कभंग
- ‘देवेंद्रजींना पुन्हा यावचं लागेल, अजितदादा तुम्ही पण या…’ भाजप नेत्याची विधानसभेतच ‘पुन्हा’ साद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

