मुंबई : RRR या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने आतापर्यंत 107.59 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत कमाईचा 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने आतापर्यंत 107.59 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरातील या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडची कमाई ही तब्बल 490 कोटी रुपये इतकी झाली आहे.
के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ या चित्रपटात दाखवला गेला आहे. अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली तरी चित्रपटाची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे.
महत्वाच्या बातम्या :


