Share

“महागाईच्या प्रश्नावर केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे”, राष्ट्रवादीची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: देशभरात इंधनाचे दर आकाशाला भिडले आहेत. मुंबईतील इंधन दरांवर नजर टाकल्यास आता पेट्रोल पाठोपाठ डिझेलनेही शंभरी गाठली आहे. महागाईचा भस्मासूर सर्वसामान्यांना आपल्या विळख्यात घेत असताना केंद्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे.अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्वीटरवर याबाबत पोस्ट करण्यात आली आहे.

सध्या संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधलेय. त्यामुळे याची दखल घेऊन वाढत्या इंधन दरवाढीला ब्रेक लावण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार का याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. मोदी सरकार इंधन दरवाढ आटोक्यात आणणार की इंधन शंभरीनंतर आता दरांची डबल सेंच्युरी पार करणार हाच खरा प्रश्न असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

दरम्यान महागाई वरूनच काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे.गेल्या ७ दिवसात इंधनाचे दर ४ रूपयांनी वाढले. निवडणूक असती तर मोदी सरकारने अशी दरवाढ होऊ दिली नसती. भाजपला केवळ सत्ता हवी आहे. जनतेशी देणेघेणे नाही.असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. तसेच ‘गरज सरो, वैद्य मरो’ वृत्तीचे केंद्रातील भाजप सरकार निवडणुका संपताच महागाई भडकवते. या संवेदनहीन आणि निर्लज्ज सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष ३१ मार्चपासून ७ दिवस महागाईच्या विरोधात आंदोलन छेडणार असल्याचेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022 RCB vs KKR : कोण जिंकणार आजचा सामना? ‘या’ संघाचं पारडं आहे जड!

“एसटी संपाला भाजपची फूस”- नाना पटोले

यश क्षितिजा पलीकडचं! कैलास खासबागेंचा सिक्युरिटी गार्ड ते पोलीस उपनिरीक्षक पदाचा प्रवास

काश्मीर फाईल्सचा विदेशात डंका, थेट ब्रिटिश संसदेतून विवेक अग्निहोत्रींना निमंत्रण  

IPL 2022 : शोएब अख्तरचा KKRविषयी मोठा खुलासा; म्हणाला “माझ्यासाठी गांगुली कोचला…”

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!