Share

IPL 2022 RCB vs KKR : कोण जिंकणार आजचा सामना? ‘या’ संघाचं पारडं आहे जड!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना डॉ.डी.वाय.पाटील स्पोर्ट्स अकादमी, मुंबई येथे संध्याकाळी साडेसात पासून रंगणार आहे.

मोठी धावसंख्या असतानाही आरसीबीला शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा स्थितीत त्यांना पहिल्या विजयाचे वेध लागले आहेत. दुसरीकडे, केकेआरच्या संघाने त्यांच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला, त्यामुळे त्यांचा उत्साह नक्कीच उंचावला असेल. उमेश यादवने मागच्या सामन्यात नव्या चेंडूने आश्चर्यकारक कामगिरी केली होती. यावेळीही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

जर आपण हेड हू हेड आकडेवारीबद्दल बोललो, तर दोन संघांमधील आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये कोलकाताचा संघ पुढे आहे. केकेआरने १६ सामने जिंकले असून आरसीबीने १३ सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू गेल्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात केकेआरकडून पराभूत झाले होता.

सध्याच्या खेळाडूंमध्ये कर्णधार विराट कोहलीने आरसीबीकडून केकेआरविरुद्ध सर्वाधिक ७७४ धावा केल्या आहेत. आरसीबीविरुद्ध केकेआरसाठी आंद्रे रसेलने १२ डावात सर्वाधिक ३७० धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!