🕒 1 min read
मुंबई: पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात हैदराबादचा संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र तरी या संघातील एका गोलंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्याचे रवी शास्त्री यांनी तोंड भरून कौतुक केले आहे.
मंगळवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) उमरान मलिकने (Umran malik) राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना झटका दिला. त्याने आपल्या गोलंदाजीने कोणालाही सोडले नाही. झालेल्या सामन्यात त्याने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या शैलीत गोलंदाजी केली, त्यानंतर चाहते त्याची तुलना अख्तरशी करताना दिसत आहेत. या सामन्यात त्याने १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याचा पराक्रमही केला आहे, त्यानंतर मलिक पुन्हा एकदा या मोसमातील सर्वात वेगवान गोलंदाज ठरला आहे.
रवी शास्त्री (ravi shastri) यांनी उमरान मलिकबद्दल सांगितले की, “तो चांगली कामगिरी करत आहे आणि मला त्याची वृत्ती आवडते. हा मुलगा शिकू शकतो. या माणसाला खरा वेग आहे, जर त्याने योग्य ठिकाणी फटके मारले तर तो अनेक फलंदाजांना अडचणीत आणेल. त्याला योग्यरित्या हाताळावे लागणार आहे. तुम्ही त्याला योग्य तो संदेश द्या. तुम्ही त्याच्याशी ज्या प्रकारे संवाद साधता ते खूप महत्वाचे असेल. त्याच्यात क्षमता आहे यात शंका नाही. हा भारतीय खेळाडू आहे.”
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 RCB vs KKR : कोण जिंकणार आजचा सामना? ‘या’ संघाचं पारडं आहे जड!
- “एसटी संपाला भाजपची फूस”- नाना पटोले
- यश क्षितिजा पलीकडचं! कैलास खासबागेंचा सिक्युरिटी गार्ड ते पोलीस उपनिरीक्षक पदाचा प्रवास
- काश्मीर फाईल्सचा विदेशात डंका, थेट ब्रिटिश संसदेतून विवेक अग्निहोत्रींना निमंत्रण
- IPL 2022 : शोएब अख्तरचा KKRविषयी मोठा खुलासा; म्हणाला “माझ्यासाठी गांगुली कोचला…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
