Share

स्वस्तात मस्त बुलेट खरेदीची संधी, रॉयल एन्फिल्डची भन्नाट ऑफर

Published On: 

मुंबई: रोज नव्या बाईक्स बाजारात येत असल्या तरीही बुलेटची क्रेझ मात्र तसूभरही कमी झालेली नाही. श्रीमंत असल्याचं प्रतिक म्हणून आजही बुलेटकडे पाहिलं जात. मात्र सामान्य ग्राहकांना इच्छा असून देखील केवळ किंमत जास्त असल्यामुळे हि गाडी घेता येत नव्हती. मात्र आता तुमच्यासाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. कंपनीने व्हेरीफाय केलेली नव्या ऐवजी जुनी पण विश्वासू आणि खात्रीलायक बुलेट तुम्हाला कमी किमतीत मिळू शकणार आहे.

royalenfield

रॉयल एन्फिल्ड कंपनीनेच यासाठी पुढाकार घेतला असून बुलेटची वाढत्या मागणीमुळे जुन्या बुलेट विकण्यासाठी स्टोअर्स सुरु केले आहेत. कंपनीने जुन्या बुलेट विकण्यासाठी सुरु केलेल्या स्टोअरला ‘विंटेज स्टोअर’ असं नाव दिलं आहे. या स्टोअर्समध्ये कमी किमतीत बुलेट उपलब्ध असतील.विंटेज स्टोअर ही एक नवी संकल्पना आहे. ज्यामध्ये वापरलेल्या महागड्या गाड्या नव्या रुपात आणल्या जातील, असं कंपनीने म्हटलं आहे.


या विंटेज स्टोअरमध्ये केवळ रॉयल एन्फिल्डचीच विक्री होईल. शिवाय जुन्या गाड्या खरेदी करण्यासाठी कर्जाची सुविधाही उपलब्ध करुन दिली जाणार आहे. इतकंच नाही तर गाडीचा विमा आणि विक्रीनंतर ज्या सुविधा नव्या गाड्यांना दिल्या जातात, त्या सुविधा दिल्या जाणार आहेत.

कंपनीने आपलं पहिलं स्टोअर चेन्नईत सुरु केलं आहे. आता देशभरात त्याचा विस्तार केला जाणार आहे.महत्त्वाचं म्हणजे या गाड्यांची क्वालिटी टेस्ट अर्थात गुणवत्ता चाचणी होईल. प्रत्येक बाईक 92 पातळ्यांवर तपासली जाईल. या स्टोअरमधून कोणतीही बाईक घेताना ग्राहकांना विश्वास वाटायला हवा, असं कंपनीचं म्हणणं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!