नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यातील पहिला सामना शुक्रवारी (४ मार्च) मोहाली येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात सगळ्यांच्या नजरा विराट कोहली वरती राहणार आहेत. त्याचं कारण ही तसेच विशेष आहे. विराट आपल्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना खेळणार आहे. कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती.
या सामन्यात सलामीवीर म्हणून कर्णधार रोहित शर्मा आणि मयंक अगरवाल डावाची सुरुवात करतील. दुखापतीमुळे लोकेश राहुल या मालिकेचा भाग नाही. त्यामुळे राहुलच्या जागी मयंकला संधी देण्याची शक्यता आहे. रोहित बऱ्याचकाळानंतर कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. दुखापतीमुळे रोहित साउथ आफ्रिकेविरुद्ध खेळू शकला नव्हता. तर ४ नंबरला विराट कोहलीचे स्थान पक्के आहे.
मागील वर्षात आपल्या पदार्पण सामन्यात जबरदस्त प्रदर्शन करणारा श्रेयस अय्यर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे अंतिम आकरामध्ये त्याचे स्थान पक्के मानले जात आहे. श्रेयसने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत ३ अर्धशतक केली होती. व “प्लेअर ऑफ द सिरीजचा” मानकरी ठरला होता. तर यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतला संधी मिळेल. त्याला टी२० मालिकेत आराम देण्यात आला होता. व सहा नंबरला हनुमा विहारीला संधी मिळू शकते.
उजव्या हाताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन फलंदाजी मध्येही चांगले योगदान देत असल्यामुळे त्याचे स्थान पक्के आहे. त्याच्याबरोबर रवींद्र जडेजा ही असणार आहे. तर जलदगती गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह असतील. व त्यांना साथ देण्यासाठी मोहम्मद सिराज या ताफ्यात असेल.
भारताचा श्रीलंकेविरुद्ध संभाव्य संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अगरवाल, श्रेयस अय्यर. विराट कोहली, हनुमा विहारी, रिषभ पंत(यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

