🕒 1 min read
मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (३ मार्च) पहिल्याच दिवशी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याचा निषेध म्हणून राज्यपाल अभिभाषणवेळी मविआ नेत्यांनी प्रचंड गोंधळ घालत घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं अभिभाषण पटलावर ठेवत भाषण न करताच ते निघून गेले. यावरूनच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी संताप व्यक्त केला आहे.
“ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. हा राज्याचा अपमान झाला आहे. राज्यपालांनी असं निघून जाणे, त्यांच्या भाषणावेळी त्यांचा अपमान होणे हे सर्व अयोग्य आहे. आम्हाला या गोष्टींमुळे धक्का बसला आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान राज्यपालांच्या या कृत्याचा मविआ सरकारकडून विरोध केला जात आहे. राज्यपालांनी आपल्या घटनात्मक जबाबदारीचं वहन करायचं टाळलंय. त्यांनी घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. हे अतिशय खालच्या पातळीवरील राजकारण आहे. माननीय राज्यपालांनी शिष्टाचाराचा भंग केला आहे. राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. राष्ट्रपतींनी याची गंभीर दखल घेऊन राज्यपालांना परत बोलवलं पाहिजे.अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘आदळ आपट करून वादळी अधिवेशन होत नाही’ – संजय राऊत
- नवाब मलीकांच्या अडचणीत वाढ, दाखल झाली अजून एक तक्रार…
- विराट कोहलीच्या १०० व्या कसोटी सामन्यासाठी गांगुली उपस्थित राहणार का नाही? आली मोठी अपडेट
- State Budget Session 2022 : विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांचे आंदोलन
- VIDEO : विराटला १००व्या कसोटी सामन्यासाठी सचिन तेंडुलकरकडून विशेष शुभेच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
