Share

“नागराजने संधी दिली तर…”; झुंड पाहील्यानंतर आमिर खानचे मोठ वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : फँड्री आणि सैराटच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी थेट बॉलिवूडचे बादशाहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड हा दमदार सिनेमा तयार केला. ४ मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याआधी सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आले. यावेळी अभिनेता आमिर खान उपस्थित होता. झुंड पाहिल्यानंतर आमिर खान भारावून गेला. आतापर्यंत पाहिलेला सर्वोत्तम सिनेमा असल्याची प्रतिक्रिया आमिर खानने दिली.

सिनेमाचे स्क्रिनिंग संपल्यानंतर आमिर खानसह उपस्थित असलेले सगळ्यांनी नागराज आणि संपूर्ण टीमने उभे राहून टाळ्या वाजवल्या. सिनेमा पाहिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देत आमिर म्हणाला, सिनेमा पाहून मी नि:शब्द झालोय. भारतीय मुला मुलींच्या भावनांना ज्याप्रकारे पडद्यावर दाखवण्यात आल्यात त्या मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. सिनेमाचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे. आम्ही २०-३० वर्षात जे काही शिकलो त्याचा नागराजने फुटबॉल केला, असे मस्करीत आमिरने म्हटले. आमिरच्या या वक्तव्यानंतर उपस्थित सर्वांना हसू लागले.

बिग बींचा आतापर्यंतचा सर्वोत्तम सिनेमा

आमिर खान पुढे म्हणाला, अमिताभ बच्चन यांनी सिनेमात अप्रतिम काम केले. त्यांनी आतापर्यंत अनेक सिनेमात काम केले पण झुंड हा त्यांचा आतापर्यंतचा सर्वोत्तम सिनेमा आहे. झुंड सिनेमाचे तोंडभरुन कौतुक केल्यानंतर आमिरने सिनेमातील सर्व कलाकारांची भेट घेतली. त्यांना त्याच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. सर्व कलाकारांनी घरी नेऊन आमिरने त्यांच्याशी गप्पा मारल्या. आमिरने त्याच्या मुलाचीही सर्व कलाराकारांशी ओळख करुन दिली.

मराठी सिनेमात काम करायची इच्छा केली व्यक्त

आमिर खानने झुंड सिनेमाचे कौतुक केल्यानंतर तुला मराठी सिनेमात काम करायचे आहे का ? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला त्यावर आमिर म्हणाला, “हो मला मराठी सिनेमात काम करायचे आहे. नागराजने मला संधी दिली तर मी नक्कीच मराठी सिनेमात काम करेन.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!