मुंबई: रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण जगात तनावाचे वातावरण बघायला मिळत आहे. युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकले असून त्यांना परत भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. या ऑपरेशनच्या माध्यमातून युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई विमानतळावर युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे.
युक्रेनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यंन मुंबई विमानतळावर स्वागत करताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला आहे. तसेच युक्रेनमधून सर्व भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीची खात्री करण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू असल्याचे देखील दानवे यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
“…ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे”, ‘त्या’ घटनेवरून आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला संताप
State Budget Session 2022 : मविआ नेत्यांची राज्यपालांविरोधात घोषणाबाजी
माजी भारतीय दिग्गजाच्या मते ‘हे’ दोन गोलंदाज श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात घेतील सर्वाधिक बळी
१००व्या कसोटी सामन्याआधी सौरव गांगुलीने केले विराटचे कौतुक द्रविडचे उदाहरण देत म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

