🕒 1 min read
मुंबई : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
औरंगाबादच्या नामांतरावरून भाजप नेते शिवसेनेवर जोरदार टीका करत आहे. अशातच आता राज्यातील महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या पाठोपाठ समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी नामांतराला आपला विरोध दर्शवला आहे.
आता, राष्ट्रवादी काँग्रेसने देखील नामकरणास विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी, ‘नामांतराचा प्रस्ताव आम्ही २० वर्षांपूर्वीच नाकारला होता. नाव बदलण्याने शहराचा विकास होतो असे आम्हाला नाही वाटत.’ तसेच, ‘नाव बदलणे हे आमच्या अजेंड्यात नसल्याचे’ सांगत मलिक यांनी देखील थोरातांनी किमान समान कार्यक्रमाची शिवसेनेला आठवण करून देत इशारा दिल्याचं एकप्रकारे समर्थन केलं आहे. त्यामुळे, शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.
यासंदर्भात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया दिली आहे. ‘औरंगाबादचं संभाजीनगर व्हावं यात दुमत नाहीच. मात्र, गेल्या ३२ वसरहानपासून शिवसेनेकडून नामकरणाचं राजकारण केलं जातंय. आता देखील येणाऱ्या महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही मागणी शिवसेनेनं केली आहे. सत्ताकाळात त्यांनी केलेल्या कामाबद्दल काहीही सांगण्यासारखं नाही.’ असा घणाघात त्यांनी केला.
तर, ‘औरंगाबादमध्ये आजही १२० तासांनंतर पिण्याचं पाणी येतं. रस्त्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी काँग्रेस-शिवसेनेनं स्वतःमध्ये कुस्ती लावली आहे. ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना क्रूर त्रास दिला. त्या औरंगजेबाबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला एवढं प्रेम का? याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं’ अशी टीका त्यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचे तब्बल १७ उमेदवार बाद, तर राष्ट्रवादीचा एकहाती विजय निश्चित; राजकीय गोटात खळबळ
- ‘आता NCPने डोळे वटारले, कुणीही यावे टपली मारून जावे अशी शिवसेनेची केविलवाणी स्थिती’
- सरपंचपदाचा लिलाव : राज्य निवडणूक आयोगाने दिले चौकशीचे आदेश
- विलासकाका उंडाळकरांच्या अंत्यदर्शनासाठी रितेश देशमुख कराडमध्ये
- पुणे-मुंबई महामार्गावर उड्डाणपुलांची गरज; सुनिल शेळकेंनी घेतली गडकरींची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

