Share

राहणे आणि पुजाराबद्दल रोहित शर्माचे मोठे वक्तव्य! म्हणाला, भविष्यात….

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यातील पहिला सामना मोहाली येथे ४ मार्च पासून खेळला जाणार आहे. परंतु भारताची कसोटी स्पेशालीस्ट जोडी म्हणून ओळखले जाणारे अजिंक्य राहणे आणि चेतेश्वर पुजारा या मालिकेत खेळताना पाहायला मिळणार नाहीत.

या दोघांनी संघासाठी बऱ्याच चांगल्या खेळ्या केल्या आहेत. परंतु त्यांचा फॉर्म सध्या खराब असल्यामुळे त्यांना संघातून वगळण्यात आले आहे. पुजारा आणि राहणे यांच्या फॉर्मबद्दल मागील काही दिवसांपासून प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यामुळेच त्यांना या मालिकेतून वगळण्यात आले असावे.

रोहित शर्मा एका प्रेस कॉन्फरन्समध्ये एएनआयच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाला, राहणे आणि पुजाराच्या जागा खूप मोठ्या होत्या. त्यांची जो कोणी जागा घेईल त्यांच्यासाठी खूप कठीण असणार आहे. पुढे रोहित म्हणाला की मला माहित नाही की या दोघांची जागा को घेईल. या दोघांनी संघासाठी जे योगदान दिले आहे. ते शब्दात सांगणे शक्य नाही. इतके वर्षे त्यांनी घेतलेली मेहनत व संघाला विदेशात मिळवून दिलेले विजय भारताला कसोटीत नंबर १ बनवण्यात त्यांचे योगदान हे विसरण्यासारखे नाही.

पुढे बोलताना तो म्हणाला की, भविष्यात यांच्यावर लक्ष दिले जाईल. ते आमच्यात सहभागी असतील. निवड समितीचेही हेच म्हणणे आहे. हे फक्त तात्पुरते आहे की, आम्ही त्यांचा विचार केला नाही. असे कुठेच लिहले नाही की या मालिकेनंतर त्यांचा विचार केला जाणार नाही.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!