मुंबई: गेल्या दोन वर्षात OTT प्लॅटफॉर्मची क्रेझ खूप वाढली आहे. कोरोना काळात चित्रपटगृहे बंद असल्याने बॉलीवूड आणि हॉलिवूडचे अनेक बिग बजेट, मल्टी स्टार चित्रपट OTT वर प्रदर्शित करण्यात आले. आणि त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला. हॉलिवूड चित्रपटांतील काल्पनिक सुपरहिरो तर भारतीयांना खूपच आवडले. मात्र यातच आपल्या मराठी मातीतील वीर बाजी प्रभू देशपांडे आणि शूरवीर मावळ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा पावनखिंड हा चित्रपट दोन वर्षांपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत होता. मग हा चित्रपट OTTवर प्रदर्शित का केला नाही, असा प्रश्न सर्वानाच पडला होता. याच प्रश्नाच उत्तर चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकरने एका व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहे.
“गेल्या दोन वर्षांत अनेकांनी विचारलं ‘पावनखिंड’ OTT वर का प्रदर्शित करत नाही?’ हे आहे त्याच उत्तर, स्वास्थ्यासाठी सामाजिक अंतर राखायलाचं हवं पण सामाजिक स्वास्थ्यासाठी लोकांनी एकत्र येऊन काहीतरी साजरही करायला हवं. प्रेक्षकहो… तुम्ही ‘पावनखिंड’ साजरा करताय, आम्ही धन्य झालो,” असं कॅप्शन देत चिन्मय मांडलेकरने थिएटरमधील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
या व्हिडिओत प्रेक्षक चित्रपटगृहात पावनखिंड पाहताना शिवरायांची गाणी म्हणत जल्लोष साजरा करत आहेत. हा चित्रपटच असा आहे कि पाहणारा प्रत्येकजण भारावून जातो. त्यामुळे नेटकऱ्यांनी मांडलेकर यांच्या या पोस्टला भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि कलाकारांची इच्छा होती की, हा चित्रपट थिएटरमधेच प्रदर्शित व्हावा. शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत १५ कोटींचा गल्ला जमवला आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: सुरेश रैना गुजरात टायटन्सचा भाग बनणार असल्याच्या चर्चांवर संघाकडून नवीन खुलासा
राज्यपाल महाराष्ट्राचे आहेत की कर्नाटकचे?; अमोल मिटकरींचा सवाल
“महाराष्ट्राची भूमिका राज्यपालांनी घ्यायला पाहीजे होती, पण…”; रोहित पवारांचा खोचक सवाल
OBC Reservation : आघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटले- प्रसाद लाड


