रशिया युक्रेन युद्धाचा आज ८ वा दिवस आहे. दोन दिवसापूर्वी रशिया आणि युक्रेनमध्ये बेलारुमध्ये चर्चा झाली होती परंतु हि चर्चा वायफळ गेली आहे असे दिसत आहे. युद्ध सुरूच असल्यामुळे चर्चेचा काही फायदा झाला नाही दिसते. आता युक्रेनने रशियाशी काहीही चर्चा करणार नाही, चर्चेला थेट युक्रेनने नकार दिला आहे.
रशियाचे ९ हजार सैनिक मारले गेले, युक्रेनचा दावा –
त्यामुळे हे युद्ध थांबेल असं आता तरी वाटत नाहीत. युक्रेनला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले परंतु युक्रेन रशियापुढे अजून झुकलेला नाही. रशियाचे ९ हजार सैनिक मारले गेले असा दावा युक्रेनने केला आहे. भारतातील अनेक लोक अजूनही युक्रेनमध्ये अडकले आहेत. या लोकांना बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न चालू असल्याचे सांगितले जात आहे.
माहितीनुसार परराष्ट्र मंत्रालय आणि सल्लागार समितीची भारतातील लोक सुरक्षित बाहेर काढण्यासंदर्भात आज बैठकही पार पडली. त्यामुळे लवकरच योग्य ते पाऊल उचलले जाईल. ही माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज दिली. रशियाने युद्ध थांबवावे असा दबाव रशियावर अमेरिका करत आहे. रशियावर अमिरीकेने बरेचसे आर्थिक निर्बंध देखील लादले. माहितीनुसार ‘यूएनजीए’ कडून रशियाचा निषेध करण्यासाठी ठराव मंजूर केला होता, यामध्ये रशियाच्या विरोधात १४१ देशांनी मतदान केले तर ५ देशांनी रशियाच्या बाजूनं मतदान केले. व ३५ देश तटस्त राहिले, तटस्थ देशामध्ये भारताचा समावेश होत असल्यामुळे अमिरीकेने नाराजी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या –


