Share

Say NO To Drugs म्हणत NCB च्या लढाईत बॉलिवूड स्टार्स सामील

Published On: 

मुंबई : ड्रग्जचे व्यसन ही सध्या देशासमोरील एक मोठी समस्या आहे. अशा परिस्थितीत एनसीबीने (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) युवकांना ड्रग्जच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी फिल्म स्टार्सची मदत घेतली आहे. एनसीबीच्या या मोहिमेत अभिनेता अली फजल, सुनील शेट्टी, शेखर सुमन आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हे सहभागी झाले आहेत. कारण या फिल्म स्टार्सना पाहून आजची तरुण पिढी खूप प्रभावित होते.

एनसीबीने त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओंना हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. लोक त्यांच्या आवडत्या स्टार्सचे म्हणणे ऐकत आहेत आणि कदाचित या गोष्टींवर विचार करून त्या आमलातही आणतील. नेटकरी हे व्हिडिओ पुन्हा री-शेयर देखील करत आहेत.

यासंदर्भात बोलताना अभिनेता अली फझल म्हणाला की, “अमली पदार्थांचे व्यसन संपूर्ण देशाची समस्या आहे. त्यामुळे व्यसनांपासून दूर राहा, तरच आपण भारताला पुढे नेण्यास सक्षम बनवू.”

सुनील शेट्टीनेही एनसीबीच्या या मोहिमेला पाठिंबा देत व्हिडिओद्वारे आपला संदेश पोहोचवला आहे. त्याने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, “जर आपली मुले ड्रग्सच्या आहारी गेली तर आपल्या केवळ देशाचेच नव्हे, तर त्या मुलांचेही आयुष्य उद्ध्वस्त होईल.” सुनील स्वतः फिटनेस फ्रीक आहे त्यामुळे तो लोकांना या व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रेरित करताना दिसत आहे.

NCB ने अभिनेता शेखर सुमन यांचा देखील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये शेखर मुलांना ड्रग्सच्या व्यसनापासून दूर ठेवण्याचे महत्त्व समजावून सांगताना दिसत आहे. ते म्हणाले, “मी आज तुम्हा सर्वांसोबत एका खास कारणासाठी सामील होत आहे. ही एक अतिशय गंभीर समस्या आहे, ज्यातून आपल्या सर्वांना आपल्या देशाला वाचवायचे आहे.”

या स्टार्ससोबतच फिटनेससाठी ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीही मुलांना ड्रग्जपासून दूर राहण्यास सांगत आहे. शिल्पा तिच्या व्हिडिओमध्ये म्हणते, “मुले या देशाचे भविष्य आहेत आणि जर ते ड्रग्सच्या तावडीत सापडले तर त्याचे परिणाम किती भयानक होतील याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का.”

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!