मुंबई: रावळपिंडी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर, पाकिस्तान संघ कराची येथील नॅशनल स्टेडियमवर दुसऱ्या कसोटीसाठी तयारी करत आहे. दुसऱ्या कसोटीपूर्वी पाकिस्तानचे खेळाडू नेटमध्ये घाम गाळताना दिसले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी कराचीमधील एका नेट सत्रादरम्यान फिरकी गोलंदाजी करताना दिसला. त्याची बॉलिंग स्टाईल बघून चाहत्यांना जडेजा आठवला.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत शाहीन आफ्रिदी (shaheen afridi) रवींद्र जडेजाच्या (ravindra jadeja) बॉलिंग ऍक्शन सारखीच ऍक्शन करत स्पिन करण्याच्या प्रयत्नात दिसला. ज्याला बघून तो जडेजाची स्टाईल कॉपी करतोय असे अनेक क्रिकेट रसिकांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. त्याची शैली पूर्णपणे जडेजाचाकडून ढापलेली दिसतीये असेही चाहत्यांचे म्हणणे आहे.
There’s a lot of Ravindra Jadeja, just a few inches taller, about Shaheen Shah Afridi bowling left-arm spin, the bounce in the hair included #PakvAus pic.twitter.com/6YCI99E9VV
— Bharat Sundaresan (@beastieboy07) March 10, 2022
maybe jadeja took the wrong flight ✈️ from mohali and landed in karachi???????? instead of bengaluru????????
— CricketAddict (@Cricket4Sarcasm) March 10, 2022
Whoever it is …is just copying jaddu style in nets…whats with so much of hype…but never know like babar made a name for himself relentlessly copying kohli he can too
— Vinayak navandar (@wisecrackerV) March 10, 2022
100% jadeja action
— Ahmad Ijaz (@ahmadijaz478) March 10, 2022
दरम्यान पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला सामना अनिर्णित राहिला आहे. ज्यात शाहीन आफ्रिदीने ८८ धावा देत दोन विकेट पटकावल्या होत्या. दुसरा कसोटी समान कराचीमध्ये १२ मार्चपासून सुरु होणार आहे. नेट्समध्ये लेफ्ट आर्म स्पिन प्रॅक्टिस करणारा आफ्रिदी येणाऱ्या सामन्यात याचा उपयोग करेल का हे पाहणे रंजक ठरेल.
महत्वाच्या बातम्या
- तुलना करु नका, सर्व कलाकार हे समान..! अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्यांना दिले चोख उत्तर…
- भाजपच्या यशानंतर मोदींचा गुजरात दौरा; रोड-शो मध्ये ‘जय श्री राम’च्या घोषणा
- दत्तक मुलगा आईची जात लावू शकतो; हायकोर्टाने दिला मोठा निर्णय!
- ‘महापालिकेच्या निवडणुकांवर परिणाम होणार नाही’ – संजय राऊत
- … आणि ऑस्ट्रेलियाचा खेळाडू बोलता बोलता पाण्यात पडला; मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

