Share

“शरद पवार हे ज्येष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत”, गोपीचंद पडळकरांचे टीकास्त्र

Published On: 

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला असून भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उतरवणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तसेच गोव्यातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे आज (११ मार्च) मुंबईत दाखल झाले असून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, तद्पश्चात मुंबईत भाजपच्या प्रदेशकार्यालयाबाहेर बोलत असतांना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच शरद पवार हे ज्येष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत, देवेंद्र फडणवीस हे असे १०-२० पवार खिशात घालून फिरतात, असे पडळकर म्हणाले आहेत.

यावेळी बोलत असतांना पडळकर म्हणाले की,‘शरद पवार हे ज्येष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत. माझ्यापेक्षा पुढे कुणी जाता कामा नये असे शरद पवार आहेत. देवेंद्र फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात. त्यांच्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व फडणवीसांचे आहे’, असे पडळकर म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘शरद पवारांकडे गद्दारीपणा, लबाडीपणा, विश्वासघातकीपणा आणि राष्ट्राच्या विरोधातील भूमिका आहेत. परंतु त्यांच्या पुढचे नेतृत्व करण्याची ताकद देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आहे’, असेही पडळकर यावेळी म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!