Share

मोदींचा जादूमुळे ‘pro-incumbency’ झाली- देवेंद्र फडणवीस

Published On: 

मुंबई: काल (१० मार्च) पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले. पंजाब व्यतिरिक्त चार राज्यांत भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यात गोव्यातही भाजपने आघाडी घेतली. याचे सर्व श्रेय गोव्याचे प्रभारी तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जाते. आज त्यांचे मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी सर्व-सामान्य माणसांच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे एकच नेते असल्याचे म्हटले आहे.

“उत्तर प्रदेशच्या तसेच इतर चार राज्यांच्या निकालानंतर हे सिद्ध झाले आहे की, सामन्यांच्या मनात मोदीच आहेत. ज्या प्रकारे चार राज्यांत मोदींच्या नेतृत्वात विजय मिळाला आहे. त्यात देशात ३७ वर्षांनंतर युपीत पहिल्यांदा भाजप पक्ष सतत दुसऱ्यांदा निवडून आले आहे. गोव्यातदेखील मला हाच अनुभव आला. गोव्यात ‎Anti-incumbency असे म्हटले जात होते. मात्र मोदींच्या जादूमुळे त्याची pro-incumbency झाली.”, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान यावेळी फडणवीस यांनी विजयाने नम्र व्हायचं, विजयाने मेहनत करायची आहे. ‘अभी तो असली लडाई मुंबई में होगी’ आम्हाला मुंबईला कोणत्या पक्षापासून वेगळं करायचं नाही. आम्हाला मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात उतरलो आहोत. असेही म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!