नवी दिल्ली: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद आयोजित करून त्यांनी ठाकरे सरकार तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत.
किरीट सोमय्या यावेळी म्हणाले, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या माफिया सेनेची इज्जत गेली आहे, गोवा यूपी जनतेने दाखवून दिलं की संजय राऊत यांच्यामार्फत स्टंट करून काही साध्य होत नाही. काल उच्च न्यायालयात ठाकरे यांनी स्वतःची इज्जत घालवून घेतली. तसेच संजय राऊत यांनी २ ट्रक कागदपत्रे दिली त्याच काय झालं?, असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
त्याच सोबत निल सोमय्यावर तुम्ही जो अत्याचार केला, त्याचा हिशोब सोमय्या नक्की घेणार, तसेच राऊत तुमच्या माफिया सेनेत दम असेल तर मला हात लावून दाखवा, असा इशारा देखील किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
हे काय? जडेजाची स्टाईल ढापली! शाहीन आफ्रिदीचा लेफ्ट आर्म स्पिन करताना व्हिडीओ होतोय व्हायरल
‘भाजपमधल्या भ्रष्टाचारी लोकांवर पंतप्रधान का बोलत नाहीत?’; नाना पटोलेंचा सवाल
तुलना करु नका, सर्व कलाकार हे समान..! अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्यांना दिले चोख उत्तर…
भाजपच्या यशानंतर मोदींचा गुजरात दौरा; रोड-शो मध्ये ‘जय श्री राम’च्या घोषणा
दत्तक मुलगा आईची जात लावू शकतो; हायकोर्टाने दिला मोठा निर्णय!


