इंग्लंड : संपुर्ण देशाचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले. चौथ्या डावात भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य न्युझीलंडने ८ गडी राखुन सहज पार केले. या सामन्यानंतर आता भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.
इंग्लंड संघासोबतच्या कसोटी मालिकेसाठी बराच वेळ शिल्लक असल्यामुळे भारतीय संघ आता तीन आठवड्यांच्या सुट्टीवर असेल 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. त्याअगोदर तीन आठवड्यांचा आराम घेऊन खेळाडू 14 जुलै रोजी सरावासाठी परत एकत्र येतील. या सुट्टीत खेळाडू कुटुंबीयांसह इंग्लंडमध्ये भटकंती करताना दिसत आहेत. या सुट्टीचा रोहित शर्मा देखील आनंद घेताना दिसत आहे.
दरम्यान रोहित शर्मा बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. रोहितने महाराष्ट्रातील लोणावळा येथे असलेले त्याचे घर विकले आहे. तब्बल 6 हजार 259 स्क्वेयर फीटचे घर रोहितने 5 कोटी 25 लाखांना विकले आहे. हिटमॅनचा बंगला कोणी विकत घेतला याची उत्सुकता सर्वांना असेल. तर हा बंगला सुषमा अशोक सराफ यांनी विकत घेतला आहे. हे घर सुषमा अशोक सर्राफ नावाच्या एका व्यक्तीने घेतले आहे. अशी माहिती समोर आली आहे. मात्र रोहितने नेमके कोणत्या कारणासाठी घर विकले आहे हे कारण समोर आलेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शोषित-वंचित घटकांचा प्रतिनिधी म्हणवणाऱ्या पडळकरांकडे ५० लाखांची गाडी कशी?’
- ‘चपटी लावलेली असली की लोक हत्तीलाही मुंगी समजतात’, आव्हाडांचा पडळकरांवर निशाणा
- ‘अपयश झाकण्यासाठी भुजबळ आणि वडेट्टीवारांकडून खोटारडेपणा सुरू’, आ.अतुल सावेंचा आरोप
- ‘गाडीवर हल्ला झाल्याने राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर’, पडळकरांची टीका
- हॉटेलमध्येच कृणाल पांड्याने सुरु केला सराव, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

