🕒 1 min read
मुंबई : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात बुधवारी सायंकाळी दगडफेक करण्यात आली आहे. घोंगडी बैठकीसाठी आमदार पडळकर सोलापुरात आले होते. काल सकाळी त्यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. गाडीवरील हल्ल्यानंतर राष्ट्रवादीला गर्भित इशारा देताना दगडच काय गोळी घातली तरी मी शांत बसणार नाही, असा पवित्रा पडळकर यांनी घेतला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा दगडफेक केलेल्या आरोपीसोबतचा फोटो ट्विट करुन राष्ट्रवादीवर आसूड ओढला आहे
या घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकरांवर टीका केलीये. ‘गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरचा हल्ला त्यांचाच प्रसिद्धी स्टंट असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला. तसेच ‘स्वत:ला शोषित-वंचित घटकांचा प्रतिनिधी म्हणवणारे गोपीचंद पडळकर ५० लाखांच्या गाडीतून कसे फिरतात, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
भाजपमधील काही जणांचे मानसिक संतुलन बिघडले
दरम्यान, शरद पवारांवर टीका केल्यानंतर अमोल मिटकरी यांनी पडळकरांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. ‘भारतीय जनता पक्षातील अन्य कुठलाही नेता व्यक्ती इतक्या खालच्या पातळीवर प्रतिक्रिया देत नाही. भाजपमधील काही जणांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यातील एक पडळकर आहेत. त्यांची ही बेताल वक्तव्य येत आहेत त्यावर गांभीर्याने लक्ष देणं योग्य वाटत नाही, अशा शब्दात मिटकरी यांनी पडळकरांच्या टीकेवर पलटवार केला.
बिरोबाची शप्पथ खाऊन समाजाची फसवणूक
ज्या माणसाने बिरोबाची शप्पथ खाऊन स्वतःच्या समाजाची फसवणूक केली. ज्यांच्यावर देवस्थानात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. एका म्हाताऱ्या महिलेची जमीन बळकावणे आणि मंगळसूत्र चोरीचाही गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे. ती व्यक्ती एक प्रवृत्तीच आहे. अशी बांडगुळं भाजपमध्ये पुढे आहेत. याचं आत्मचिंतन भाजपने करावं, असा टोला मिटकरी यांनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चपटी लावलेली असली की लोक हत्तीलाही मुंगी समजतात’, आव्हाडांचा पडळकरांवर निशाणा
- ‘अपयश झाकण्यासाठी भुजबळ आणि वडेट्टीवारांकडून खोटारडेपणा सुरू’, आ.अतुल सावेंचा आरोप
- ‘गाडीवर हल्ला झाल्याने राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर’, पडळकरांची टीका
- हॉटेलमध्येच कृणाल पांड्याने सुरु केला सराव, म्हणाला…
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का ; ‘हा’ खेळाडू मालिकेतून बाहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
