सोलापूर : भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सध्या बहुजन संवाद दौरा सुरू केला आहे. त्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात ते घोंगडी बैठका घेत आहेत. काल बुधवारी सकाळी सोलापुरात पत्रकार परिषदेत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांचा डीएनए बहुजन विरोधी असल्याचंही ते म्हणाले होते. पडळकरांनी केलेल्या या टीकेमुळंच त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली असावी, अशी चर्चा आहे.
बुधवारी रात्री गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर आज गुरुवारी पडळकर यांनी सोलापूर शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘या घटनेमुळे राष्ट्रवादीचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. कारण, मागच्या वर्षभरामध्ये घडलेल्या घडामोडी महाराष्ट्रातील बहुसंख्य बहुजनांवर अन्याय करणाऱ्या आहेत आणि त्याच्याविरोधामध्ये मी जाहीरपणे आवाज उठवत आहे. घोंगडी बैठकांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे राष्ट्रवादी तळातून हललेली आहे. लोक जागे होताहेत ये राष्ट्रवादीला पटत नाहीये, त्यामुळे राष्ट्रवादी मुद्द्यावरून गुद्द्यावर गेली आहे.
‘राष्ट्रवादीने गोपीचंद पडळकराच्या गाडीवर मारलेला हा दगड नाही, तर महाराष्ट्रातील उपेक्षित पीडितांच्या डोक्यात दगड मारण्याचा हा प्रयत्न आहे, पण हा दगड उलटून राष्ट्रवादीच्याच डोक्यावरती पडणार आहे. आमच्या कार्यक्रमात रोहित पवारांच्या फोटोचे टी- शर्ट घातलेले कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या लोकांनी गोळ्या जरी घातल्या तरी महाराष्ट्रातील लोकांना जागे करण्याचं काम थांबवणार नाही’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- हॉटेलमध्येच कृणाल पांड्याने सुरु केला सराव, म्हणाला…
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का ; ‘हा’ खेळाडू मालिकेतून बाहेर
- ‘बेस्ट ऑफ थ्री’वर गांगुलीची प्रतिक्रिया, म्हणाला…
- गीलच्या जागी द्रविडच्या ‘या’ शिलेदाराची वर्णी लागेल का?
- ‘टप्परछाप आचार्य सध्या मस्तीची भाषा करून वारकरी संप्रदायाला बदनाम करतायत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

