मुंबई : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल सोलापूर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोणी तसं मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे,’ अशी बोचरी टीका पडळकर यांनी केली होती.
तसेच ‘तीन खासदार अन साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असणाऱ्या ‘भावी’ पंतप्रधान शरद पवार यांना पुढील तीस वर्षांच्या ‘भावी’ पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा आहेत’ अशी कोपरखळी त्यांनी मारली. मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत, त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा आहे, असा चिमटाही पडळकर यांनी पवारांना काढला.
यानंतर त्याच रात्री पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक झाली. पवारांवर टीका केल्याने हा प्रकार झाल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मी चपटी लावलेली असली की मी हत्तीलाही मुंगी समजतो’ असे ट्विट आव्हाड यांनी पडळकरांना उद्देशून केले आहे.
मी चापटी लावलेली असली ……………..
कि मी हत्ती ला हि मुंगी समजतो— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 30, 2021
शिवाय, ‘महाराष्ट्राच्या राजकारणात हे सर्वश्रूत आहे की, जोपर्यंत शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर आपण टीका करत नाही. तोपर्यंत मीडिया आपली दखल घेणार नाही. आपल्याला बातमीत राहायचे असेल तर बाकी काही बोलले नाही तरी चालेल. पण, शरद पवार यांच्याबद्दल खालच्या पातळीत बोला. काम झालेच म्हणून समजा’ असे ट्विटही आव्हाड यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अपयश झाकण्यासाठी भुजबळ आणि वडेट्टीवारांकडून खोटारडेपणा सुरू’, आ.अतुल सावेंचा आरोप
- ‘गाडीवर हल्ला झाल्याने राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर’, पडळकरांची टीका
- हॉटेलमध्येच कृणाल पांड्याने सुरु केला सराव, म्हणाला…
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का ; ‘हा’ खेळाडू मालिकेतून बाहेर
- ‘बेस्ट ऑफ थ्री’वर गांगुलीची प्रतिक्रिया, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

