🕒 1 min read
औरंगाबाद : सध्या ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. यासाठी लोणावळा येथे सर्वपक्षीय नेत एकत्रही आले होते. तरीही भाजपचे नेते यासाठी राज्य सरकारला तर महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकारला जबाबदार धरीत आहेत. ओबीसींच्या आरक्षणासंबंधी सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने जनगणनेद्वारा गोळा केलेली माहिती कधीच मागितली नव्हती. अपयश झाकण्यासाठी आघाडी सरकारमधील मंत्री छगन भुजबळ व विजय वडेट्टीवार हे खोटे सांगून केंद्र सरकारवर दोषारोप करीत आहेत अशी टीका भाजप आमदार अतुल सावे यांनी केली आहे.
ते म्हणाले, ओबीसी प्रवर्गाची जनगणनेद्वारे गोळा केलेली माहिती मोदी सरकारकडे आहे. ही माहिती मोदी सरकार देत नसल्याने आरक्षण रद्द झाल्याचा कांगावा काँग्रेस-राष्ट्रवादीने सुरू केला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने कृष्णमूर्ती यांच्या याचिकेवरील निकालातील परिच्छेद ४८ मधील निष्कर्ष-३ (परिच्छेद ४८/ कन्फ्युज-३) मध्ये स्पष्टपणे एम्पिरिकल डाटा हा शब्द वापरला आहे. सेन्सस( जनगणना) हा शब्द वापरला नाही. आपले अपयश झाकण्यासाठी आघाडी सरकारमधील मंत्री सर्वोच्च न्यायालयाच्या नावावर धादांत खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोपही आमदार सावे यांनी केला आहे.
ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवण्यासाठी फडणवीस सरकारने ३१ जुलै २०१९ रोजी अध्यादेश काढला होता. सर्वोच्च न्यायालयाने हा अध्यादेश मान्य केला होता. आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर हा अध्यादेश कायद्यात रूपांतरित करण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केली नाही. डिसेंबर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे ओबीसींचा एम्पिरिकल डाटा मागितला होता.
मागासवर्गीय आयोग स्थापन करून हा डाटा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आघाडी सरकारने दिरंगाई केली. सत्तेत आल्यानंतर पंधरा महिने आघाडी सरकारने मागासवर्गीय आयोग स्थापन केला नाही. या सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द व्हावे, यासाठीच हेतुपूर्वक ही दिरंगाई केल्याची शंका उपस्थित होत आहे, असा आरोपही आमदार सावे यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गाडीवर हल्ला झाल्याने राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर’, पडळकरांची टीका
- हॉटेलमध्येच कृणाल पांड्याने सुरु केला सराव, म्हणाला…
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का ; ‘हा’ खेळाडू मालिकेतून बाहेर
- ‘बेस्ट ऑफ थ्री’वर गांगुलीची प्रतिक्रिया, म्हणाला…
- गीलच्या जागी द्रविडच्या ‘या’ शिलेदाराची वर्णी लागेल का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
