Share

हॉटेलमध्येच कृणाल पांड्याने सुरु केला सराव, म्हणाला…

Published On: 

श्रीलंका : शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ सोमवारी श्रीलंकेत दाखल झाला. श्रीलंकेत टीम इंडिया तीन एकदिवसीय सामने आणि तब्बल टी -20 सामने खेळणार आहे. या दौर्‍याची सुरुवात वनडे मालिकेपासून होईल. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी, दुसरा 16 रोजी आणि तिसरा वनडे 18 रोजी खेळला जाईल. भारताचे प्रमुख खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये असल्याने या दौऱ्यासाठी नवख्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

भारतीय संघ आता श्रीलंकेत दाखल झाला असून खेळाडू २९ जून ते १ जुलै या कालावधीत हॉटेलमध्ये क्वारंटाईन राहणार आहेत. त्यानंतर २ ते ४ जुलै या कालावधीत त्यांना सराव करण्याची परवानगी असणार आहे. ५ जुलैपासून हा संघ एकत्र सराव करण्यास सुरुवात करतील, अशी माहिती श्रीलंका क्रिकेटच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

https://www.instagram.com/reel/CQu-2I7n-i1/?utm_source=ig_web_copy_link

या सामन्यासाठी भारतीय संघ जोरदार मेहनत करताना दिसत आहे. क्वारंटाईन कालावधीत टीम इंडिया विविध प्रकारे सराव करताना दिसत आहे. अशातच कृणाल पांड्याने आपल्या सरावाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शन लिहिले आहे की, ‘तुम्ही विचार केला तर तुम्ही कोठेही ट्रेनिंग घेऊ शकता.’ त्याचा या व्हिडिओला सोशल मीडियावर बरीच पंसती देखील मिळत आहे. त्याच्या या व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया देखील मिळत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!