Share

पोलार्डमुळे रोहित शर्माला बसला १२ लाख रुपयांचा दंड

Published On: 

चेन्नई : आयपीएलमध्ये मगंळवारी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि गत उपविजेते दिल्ली कॅपीटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने मुंबई इंडियन्सचा ६ गडी राखुन पराभव केला. मुंबई इंडियन्सने दिलेले १३८ धावांचे अव्हान दिल्लीने १९.१ षटकात ४ गडी गमावून पार केले. दिल्लीकडून ४ गडी बाद करणाऱ्या अमित मिश्राला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील हा या हंगामातील दुसरा पराभव होता. या पराभवानंतर कर्णधार रोहितला आणखी एक धक्का बसला आहे. सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने आयपीएल गवर्निंग काउंसिलकडून रोहितला १२ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र महत्वाची बाब म्हणजे सामन्याच्या दुसऱ्या डावात रोहित तिसऱ्या षटकापासुन मैदानावर नव्हता. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हे केरॉन पोलार्डने केले होते. त्यामुळे खरी चुक ही पोलार्डची होती. मात्र भुर्दंड रोहित शर्माला बसला.

जर ही चुक दुसऱ्यांदा घडली तर दंडाची रक्कम दुप्पट म्हणजे २४ लाख रुपये भरावी लागेल. जर तिसऱ्यांदा असी चूक झाल्यास कर्णधाराला तब्बल ३० लाख रुपये दंड म्हणून द्यावे लागणार आहेत. याबरोबरच त्याच्यावर एका सामन्यासाठी बंदीही घालण्यात येईल. नियमानुसार प्रत्येक संघाने आपली २० षटके ९० मिनिटांत पूर्ण करणे गरजेचे आहे. यापूर्वी २० वे षटक हे ९० व्या मिनिटाला सुरु करावे असा नियम होता, परंतु आता दीड तासाच्या आत निर्धारित २० षटके पूर्ण करावी लागणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!