Share

कॅपीटल्स पडले पलटनवर भारी; अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा मुंबई इंडियन्सवर ६ गडी राखुन विजय

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : आयपीएलमध्ये मगंळवारी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि गत उपविजेते दिल्ली कॅपीटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने मुंबई इंडियन्सचा ६ गडी राखुन पराभव केला. मुंबई इंडियन्सने दिलेले १३८ धावांचे अव्हान दिल्लीने १९.१ षटकात ४ गडी गमावून पार केले. दिल्लीकडून ४ गडी बाद करणाऱ्या अमित मिश्राला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईचा सलामीवीर डीकॉक तीसऱ्या षटकात बाद झाला. यानंतर कर्णधार रोहित शर्मा(४४) आणि सुर्यकुमार यादव(२४) यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. रोहित बाद झाल्यानंतर इशान किशन वगळता मधल्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाले. आठव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या जंयत यादवने २३ धावांची छोटेखानी खेळी केल्याने मुंबईला १३७ धावापर्यंत मजल मारता आली. मुंबईकडून कर्णधार रोहितने ३० चेंडुत ३ चौकार आणि ३ षटकारांसह सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली.

लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात सलामीवीर पृथ्वी शॉ अवघ्या ७ धावा करुन माघारी परतला. यानंतर शिखर धवन(४५) आणि स्टीव्ह स्मिथ(३३) यांनी संघाचा डाव सावरला. शिखर धवन आणि कर्णधार रिषभ पंत ठरावीक अतंराने बाद झाल्याने सामन्यात पुन्हा मुंबई पुनरागमन करेल असे वाटत असताना ललीत यादव(२२) आणि शिम्रोन हेटमायर(१४) यांनी नाबाद भागीदारी करत मुंबई इंडियन्सवर ६ गडी राखुन विजय मिळवला. ४ षटकात २४ धावा देत ४ बळी मिळवणाऱ्या अमित मिश्राला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मनीत करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!