चेन्नई : आयपीएलमध्ये मगंळवारी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि गत उपविजेते दिल्ली कॅपीटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने मुंबई इंडियन्सचा ६ गडी राखुन पराभव केला. मुंबई इंडियन्सने दिलेले १३८ धावांचे अव्हान दिल्लीने १९.१ षटकात ४ गडी गमावून पार केले. दिल्लीकडून ४ गडी बाद करणाऱ्या अमित मिश्राला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या सामन्यातील पहिल्या डावात मुंबईकडुन कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ४४ धावांची खेळी साकारली. दुसऱ्या डावात रोहित मैदानावर नसल्याने पोलार्ड मुंबईचे नेतृत्व करत होता. सामना संपल्यानंतर मैदानात न राहण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित म्हणाला की,’ही एक छोटीशी गोष्ट आहे, काही वेळातच चांगली होऊन जाईल.’. रोहितच्या या वक्तव्यानंतर त्याला छोटीशी दुखापत झाली असल्याचा अंदाज मुंबई इंडियन्सचे चाहते लावत आहेत.
यापुर्वी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ छोट्या लक्ष्याचा बचाव करण्यात यशस्वी ठरला होता, त्यामुळे मुंबईचे समर्थक निश्चीत होते. मात्र या सामन्यात तसे घडले नाही. कारण दुसऱ्या डावातील तिसऱ्या षटकानंतर रोहित मैदानावर नव्हता. यामुळे रोहितचा सुपरहिट फॉर्मुला चालु शकला नाही. मात्र तो मैदानाबाहेर का गेला याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते.
महत्वाच्या बातम्या
- कॅपीटल्स पडले पलटनवर भारी; अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा मुंबई इंडियन्सवर ६ गडी राखुन विजय
- परभणीच्या महसूल विभागातील सर्व सुनावण्या बंद राहणार : जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर
- कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी खाजगी अस्थिव्यंग तज्ज्ञ देणार सेवा
- औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागामध्ये वाढतोय कोरोनाचा कहर
- लॉकडाऊन लावू नका, हा अखेरचा पर्याय ठेवा ; मोदींचा राज्यांना सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
