Share

पराभवानंतर गुणतालीकेत स्थान न गमावता मुंबई इंडियन्सला बसला ‘असाही’ फटका

Published On: 

चेन्नई : आयपीएलमध्ये मगंळवारी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि गत उपविजेते दिल्ली कॅपीटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने मुंबई इंडियन्सचा ६ गडी राखुन पराभव केला. मुंबई इंडियन्सने दिलेले १३८ धावांचे अव्हान दिल्लीने १९.१ षटकात ४ गडी गमावून पार केले. दिल्लीकडून ४ गडी बाद करणाऱ्या अमित मिश्राला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने सहज विजय साकारला. दिल्लीने विजय मिळवताच आरसीबीला धक्का देत गुणतालीकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. या सामन्यापुर्वी दिल्ली तिसऱ्या स्थानावर होता तर मुंबई इंडियन्स हा संघ चौथ्या स्थानावर होता. मुंबईने आपले स्थान जरी अबाधित राखले असले तरीही धावगतीमध्ये मुंबईला नुकसान सोसावे लागले आहे. सामन्यापुर्वी मुंबईची धावगती ही +०.३६७ इतकी होती. तर पराभवानंतर मात्र ती +०.१८७ इतकी झाली आहे.

या सामन्यात विजय मिळवल्याने दिल्ली संघाचे गुण हे सहा झाले आहे. तर गुणतालीकेत पहिल्या स्थानी विराजमान असलेल्या आरसीबी संघाचेही गुण ६ आहे. मात्र आरसीबीची धावगती ही दिल्ली कॅपीटल्सपेक्षा जास्त आहे. आरसीबीची धावगती ही +०.७५० इतकी आहे, तर दिल्लीची धावगती +०.४२६ इतकी आहे. स्पर्धेत आरसीबीचा संघ हा अद्याप अजिंक्य आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!