सूनावणी करीता ये – जा करणारे नागरीक, अधिकारी – कर्मचारी हे प्रादुर्भावापासून दूर रहावेत, म्हणून हा निर्णय घेत असल्याचे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी म्हटले आहे. या वेळी कोरोना च्या पार्श्वभूमीवर विनाकारण कार्यालयात तसेच परिसरामध्ये गर्दी जमा होते, आणि या गर्दीच्या माध्यमातून खुप मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग पसरत आहे. त्या मुळे सोशल डिस्टंसिंग पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अत्यंत्य महत्वाचे तसेच प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणुन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे देखील या वेळी सांगण्यात आले आहे.
शहरासह जिल्हाभरामध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. तसेच ऑाक्सिजन तसेच रेमेडिसिविर हे इंजेक्शना तुटवडा पडण्यासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे खुप गरजेचे आहे. याच बरोबर व्हेंटिलेटर्स ची संख्या देखील कमी पडत असल्याने हा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तर ३० एप्रिल नंतर पुढील जो काही निर्णय घेण्यात येणार असेल तो, त्या – त्या तारखेनुसार नागरिकांना सांगण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
- औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नागरी मदत केंद्राची स्थापना
- परिवहन महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी सरकारचा नवा फंडा
- औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या ‘या’ महत्वाकांक्षी प्रकल्पास सुरुवात!
- रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान मिळणार पण…
- सुशांतच्या बायोपिकवर बंदीसाठी वडील हायकोर्टात, निर्मात्यांना नोटीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
