मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटातील वादाला आत वेगळं वळण मिळालं आहे. त्याचबरोबर अंधेरी (पूर्व) मध्ये पोट निवडणुकीपर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोणालाच वापरता येणार नाहीय. आयोगाच्या निर्णयानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.
काय म्हणाले रोहित पवार ?
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निकाल लोकांसाठी धक्कादायक असला तरी अनपेक्षित मात्र नक्कीच नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी हे म्हटलं आहे. पुढे त्यांनी असंही म्हटलं आहे की, चिन्ह गोठवलं म्हणजे आपले मनसुबे साध्य होतील, असा त्रयस्थांचा अंदाज असला तरी लोकांच्या मनातली निष्ठा मात्र गोठवता येणार नाही, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटावर हल्ला केला असल्याचं समजतं आहे.
#शिवसेना हे नाव आणि #धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निकाल लोकांसाठी धक्कादायक असला तरी अनपेक्षित मात्र नक्कीच नाही. चिन्ह गोठवलं म्हणजे आपले मनसुबे साध्य होतील असा त्रयस्थांचा अंदाज असला तरी लोकांच्या मनातली निष्ठा मात्र गोठवता येणार नाही.#ShivsenaSymbol pic.twitter.com/7ZY1VdED9v
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 8, 2022
तसेच,दसरा मेळाव्यात दिसलेली निष्ठा निवडणुकांमध्येही निश्चित दिसेल. धनुष्यबाणाचं चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठल्याने खऱ्या शिवसैनिकाला अत्यंत वेदना होत असणार, हे मात्र खरं आहे. पण ज्यांना त्रास होत नसेल त्यांनी दुसऱ्यांची स्क्रिप्ट स्वीकारली असंच म्हणावं लागेल, असंही रोहित पावर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दोन्ही गटातील नेते नाराज झाले आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे नेते आणि ठाकरे गटाचे नेते एकमेकांवर आरोप, टीका-टिपण्णी करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर दोन्ही गट पोट निवडणूकीसाठी कोणतं चिन्ह निवडतात. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Breaking News। नाशिकमध्ये अजून एक दुर्घटना; गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग
- Mobile Hack | तुमचा मोबाईल देखील वारंवार गरम होत असतो का?, मग ‘या’ टिप्स करा फाॅलो
- Jaidev Thackeray | जयदेव ठाकरे यांच्या मुलाचा उद्धव ठाकरेंना पाठींबा ; ठाकरे पिता-पुत्रामध्ये मतभेद!
- Shivsena | धनुष्यबाण कोणाला? दिल्लीत वेगवान घडामोड, निवडणूक आयोगाची तातडीची बैठक
- Health Tips | ‘या’ नैसर्गिक गोष्टी वापरून मजबूत करा Immunity सिस्टीम


