राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांनी अखेर करुन दाखवलं आहे. राष्ट्रवादीने कवठेमहांकाळ नगरपंचायत (kavathe mahankal nagar panchayat election 2022 result) निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने १० जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. विरोधी शेतकरी विकास पॅनलला ६ जागांवर समाधान मानावं लागलं.
सर्व पक्ष विरोधात असतांना रोहित पाटलांनी विरोधकांना धूळ चारली. दरम्यान, रोहित पाटलांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी रोहित पाटलांचे अभिनंदन केले आहे. “शाब्बास… रोहित! खूप खूप अभिनंदन!”, असे रोहित पवार म्हणाले.
रोहित पाटील (Rohit Patil) यांनी प्रचारादरम्यान विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला होता. निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर आर आबांची आठवण होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. रोहित पाटील यांनी दिलेला इशारा आता निवडणुकीच्या निकालात सत्यात उतरवला. विरोधकांना खरोखरच आबांची म्हणजेच आरआर पाटील (R.R. Patil) यांची रोहित पाटील यांनी आठवण करून दिली आहे.
या निवडणुकीच्या विजयानंतर आणि कवठे महंकाळ नगरपंचयातीवर एकहाती सत्ता मिळवल्यानंतर रोहित पाटील यांना त्यांचे वडील आरआर पाटील यांची आठवण आली. रोहित पाटील म्हणाले की, आबांची आठवण येत आहे. त्यांचं स्वप्नं होतं की कवठे महंकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता स्थापन व्हावी आणि आज राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता स्थापन झाली असून आबांचे स्वप्न पूर्ण केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- बापरे! बेपत्ता अभिनेत्रीचा पोत्यात बांधलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, पतीला अटक
- औरंगाबादेत होणार ४०० खाटांचे महिला व शिशु रुग्णालय; खा. जलील यांनी केली पाहणी!
- “रोहित लोकांचा विश्वास सार्थकी ठरवेल”; कर्जत नगरपंचायतीवर ताबा मिळवल्यानंतर अजित पवारांनी केले कौतुक
- धनुष-ऐश्वर्या दोघेही आहेत करोडोंचे मालक, ऐकूण व्हाल थक्क
- रोहित पाटील यांनी विरोधकांना खरंच बाप आठवून दिला


