औरंगाबाद:खासदार इम्तियाज जलील यांनी २०१३ साली घोषित झालेल्या २०० खाटांचे महिला व शिशु रुग्णालयास शहरात जागा उपलब्ध करुन बांधकाम करण्यात यावे याकरिता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याअनुषंगाने जालना रोडवर जागा उपलब्ध होवऊन खासदार इम्तियाज जलील(Imtiyaz Jaleel) यांच्या यशस्वी पाठपुराव्यांमुळे निधीची मान्यता सुध्दा मिळाली आहे. सद्यस्थितीत आज जालना रोडवर २०० ऐवजी ४०० खाटाच्या भव्य रुग्णालयाचे बांधकाम युध्दस्तरावर सुरु आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी ४०० खाटाच्या रुग्णालयाच्या प्रगतीपथावरील बांधकामाची पाहणी करुन कार्यारंभ आदेशात नमुद केल्याप्रमाणे विहीत वेळेत गुणवत्तापुर्ण, दर्जात्मक व दोषमुक्त बांधकाम पुर्ण करण्याचे सुचना उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. पाहणी दरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी खासदार इम्तियाज जलील यांना रुग्णालय आणि वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांच्या बांधकामाची संपुर्ण माहिती देऊन सद्यस्थितीत रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे फुटींगचे काम व पार्किंग लेव्हल वरील पुर्ण झालेल्या बीम कामाची तांत्रिक माहिती दिली. ३० महिन्यांच्या कालावधीत बांधकाम पुर्ण होणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.
चार मजली रुग्णालयाचे मुख्य इमारत बेसमेंन्ट पार्किंग, वरिष्ठ तळ व चार मजले असे स्वरुप असणार आहे यामध्ये पार्किंग एरिया, स्वच्छता गृह, वॉशिंग, स्टोर / रेकॉर्ड, सुरक्षा केबिन, मेडिसिन स्टोर, रेकार्डरुम, ओ.पी.डी., फॅमिली प्लांनिंग रुम, एक्स-रे रेडिओलोजिस्ट, स्टेशनरी रुम, एस.एस.एस.डी रुम, हिस्टोलोजी-साप्टोलोजी लॅब, सोनोग्राफी – ईसीजी रुम्स, पेडियाट्रिक्स, नर्सिंग-न्युट्रिश्न, एस-इंटिंग्रेशन, एक्सामिनेशन, पेडियाट्रिक्स वार्ड ओ.टी.ब्लॉक, मेडिसिन व ईक्विपमेंट स्टोर, लोबी-ए.एन.सी वार्ड, शस्त्रक्रिया विभाग, विविध चाचण्यांचे लॅब, विविध वैद्यकीय तांत्रिक विभाग असतील. या रुग्णालयासाठी जलील यांनी आमदार असतांना विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

