Share

रोहित पाटील कवठेमहांकाळ निवडणुकीमुळे वादात ; पराभूत उमेदवारांची न्यायालयात धाव

Published On: 

🕒 1 min read

सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील (Rohit Patil in controversy due to Kavathemahankal election)अडचणीत सापडले आहेत. रोहित पाटलांनी गाजवलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत मयत व्यक्तींच्या नावे मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कवठेमहांकाळ नगरपंचायत मधील प्रभाग १० आणि १६ मध्ये हा प्रकार घडला आहे. बनावट मतदानाविरुद्ध पराभूत उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. प्रभाग १६ मध्ये मयत, दुबार, चुकीचे असे १३ बनावट मतदान झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रभाग १० आणि १६ मध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची निवड रद्द करावी, यासाठी जिल्हा न्यायालयात पराभूत उमेदवारांनी तक्रार दाखल केल्याची माहिती ॲड. अमित शिंदे यांनी दिली आहे.

दरम्यान प्रभाग क्रमांक १० मधील शेतकरी विकास आघाडी तर्फे उमेदवारी करणाऱ्या उदय शिवाजीराव शिंदे यांनी निवडून आलेले उमेदवार अब्दूलहमीद ब्रदुद्दीन शिरोळकर यांची निवड रद्द करण्याची मागणी केली आहे. या प्रभागात ७ मयात व्यक्तींच्या नावे मतदान करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या मयत मतदानामध्ये निवडून आलेले उमेदवार शिरोळकर यांचे मयत वडील व दोन चुलते यांच्या नावाने देखील बनावट मतदान झाले आहे. त्यामुळे उदय शिंदे यांनी त्यांची विजयी उमेदवार म्हणून घोषणा करण्याची मागणी केली आहे.

तर प्रभाग १० मधील आरपीआयचे उमेदवार नानासाहेब सदाशिव वाघमारे यांनी विजयी उमेदवार संजय विठ्ठल वाघमारे व इतर पराभूत उमेदवार यांच्या विरुद्ध दाद मागितली आहे. याठिकाणी ३ मयत व्यक्तींच्या नावे मतदान झाल्याचे म्हटले जात आहे. आता या धक्कादायक प्रकारामुळे कवठेमहांकाळ नगरपंचायत ही निवणूक पुन्हा चर्चेत आली आहे.

तर कडेगाव नगरपंचायतीमध्ये दुबार मतदानाची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे प्रभाग १३ , १४ आणि १७ मध्ये भाजपच्या चिन्हावर निवडूण आलेल्या उमेदवारांची निवड रद्द करून काँग्रेस उमेदवारांना विजयी घोषित करावे यासाठी उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!