मुंबई : येत्या काहीच दिवसात महाराष्ट्र राज्यातील १० महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल. पुणे- मुंबई सह राज्यातील १० महानगरलीकांमध्ये निवडणूका होणार आहेत. या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राज्यातील सत्ताधारी आघाडी महाविकास आघाडीमध्ये चुरस असणार आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये सर्वच महापालिका निवडणूका एकत्र लढवायच्या कि आपल्या परीने जिथे शक्य असेल तिथे स्वतंत्र निवडणूका लढवायच्या यात खलबत चालू आहेत.
मात्र कल्याण- डोंबविली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आघाडी होण्याचे संकेत आता मिळत आहेत. कल्याण- डोंबविली महापालिका सह पालघर, नवी मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकांसाठी पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आघाडी होण्याचे संकेत मिळाले आहेत. आज राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हाध्यक्षांची संयुक्त बैठक पार पडली. त्यात ठाणे जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचे सिंहावलोकन करण्यात आले. ठाणे महापालिका सह कल्याण- डोंबविली, पालघर, नवी मुंबई या महापालिका निवडणूकात पण शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात आघाडी होण्याचे संकेत आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मिळाले आहेत.
तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांविरोधात कोणीही कुठल्याही प्रकारची टीका करू नये असे पण एकमत झाले आहे. महाविकास आघाडीचा प्रमुख विरोधक हा भारतीय जनता पक्ष असून आपल्या आपल्यात भांडण्यात अर्थ नाही असा पण विचार राष्ट्रवादीच्या या बैठकीत मांडण्यात आला.
महत्वाच्या बातम्या :
- संजय राऊत यांचा फक्त हवेत गोळीबार सुरू – गिरीश महाजन
- रणजी ट्रॉफी: शाहरुख खानची दमदार बॅटिंग; फक्त ६ धावांनी द्विशतक हुकले!
- कितीही केस करा, घाबरत नाही, झुकणार नाही – मोहीत कंबोज
- लाव रे तो व्हिडीओ..! विनायक राऊतांचा नारायण राणेंवर हल्लाबोल!
- ऋषभ पंत नाही तर ‘हा’ वेगवान गोलंदाज असेल भारतीय संघाचा उपकर्णधार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

