मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वयाच्या १७ व्या वर्षी आपल्या नावावर बार परवाना घेतल्याने त्यांच्यावर आता कोपरी पोलिस ठाण्यात कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्यांना अगोदरही नोटीस बजावण्यात आली होती.
नेमके प्रकरण काय?
समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे १९९७ साली उत्पादन शुल्क कार्यालयात नोकरीला होते. त्यावेळी त्यांनी समीर वानखेडेंच्या नावावर बारचे परमीट काढले होते. यावरच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आक्षेप घेत अल्पवयीन मुलाला बारचं परमीट देणं हा सर्वात मोठा फर्जीवाडा असल्याचा आरोप केला होता.
दरम्यान बार परवाना घेण्याच्या वेळी वय कमी असल्याने ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने समीर वानखडे यांच्या वाशी येथील सद्गुरू बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- अजबच! मानधन न मिळाल्याने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने स्पर्धा सोडली; पाकिस्तान सुपर लीगने केले त्याला आजीवन बॅन
- तर केंद्र सरकारने Ministry of Dress Design नेमावे; हिजाब वादावर जितेंद्र आव्हाड आक्रमक!
- भाजपचं खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणं चुकीचं – अशोक चव्हाण
- गामी कल्याण- डोंबिवली महापालिका निवडणुकी बाबतीत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये महत्वाचा निर्णय
- भारत ४० वर्षानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) सत्राचे आयोजन करणार!


