नांदेड : राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असं युद्ध सुरु आहे. भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. तर महाविकास आघाडीकडून देखील भापवर पलटवार करण्यात येत आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केली आहे.
भाजपचं खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणं हे चुकीचं आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. ते आज नांदेडमध्ये बोलत होते.