मुंबई: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जेम्स फॉकनरने पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधून आजीवन बंदी घालण्यात आली आहे. त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि त्याची फ्रेंचायझी क्वेटा ग्लॅडिएटर्स यांनी कराराचा “सन्मान” न केल्याने स्पर्धेतून माघार घेतली होती. या मोसमात ग्लॅडिएटर्ससाठी सहा सामने खेळणाऱ्या फॉकनरने ट्विटरवर यासंबंधी भाष्य केले आहे.
जेम्स फॉल्कनरने या स्पर्धेतून माघार घेतल्याबद्दल पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांची माफीही मागितली होती.त्याने लिहले “मी पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांची माफी मागतो. पण दुर्दैवाने, पीसीबीने माझ्या करारातील करार/पेमेंटचे पालन न केल्यामुळे मला शेवटच्या दोन सामन्यांमधून माघार घ्यावी लागली आणि पीएसएल सोडावे लागले. मी तिथेच होतो आणि त्यांनी माझ्याशी खोटे बोलणे सुरू ठेवले. पीसीबी आणि पीएसएलकडून मला अपमानास्पद वागणूक मिळाली आहे. मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण माझी स्थिती समजून घ्याल”
1/2
I apologise to the Pakistan cricket fans.
But unfortunately I’ve had to withdraw from the last 2 matches and leave the @thePSLt20 due to the @TheRealPCB not honouring my contractual agreement/payments.
I’ve been here the whole duration and they have continued to lie to me.— James Faulkner (@JamesFaulkner44) February 19, 2022
PCB and Quetta Gladiators strongly refute James Faulkner’s baseless allegations.
Read more: https://t.co/fEfqU4X471 #HBLPSL7
— PakistanSuperLeague (@thePSLt20) February 19, 2022
पीसीबीने फॉकनरच्या ट्विटला प्रतिउत्तर देखील दिले आहे. पीसीबी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स जेम्स फॉकनरच्या निंदनीय वागणुकीमुळे निराश झाले आहेत. तो २०२१ मध्ये एचबीएल पाकिस्तान सुपर लीगच्या अबू धाबी-लेगचा देखील भाग होता. त्याला आणि इतर सहभागी खेळाडूंनाही आम्ही पूर्ण सन्मान आणि आदर दिला आहे. त्याने पाकिस्तान क्रिकेट आणि एचबीएल पाकिस्तान सुपर लीगची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे तो यापुढे कधीही पाकिस्तान क्रिकेटचा भाग नसणार आहे.”
महत्वाच्या बातम्या
- तर केंद्र सरकारने Ministry of Dress Design नेमावे; हिजाब वादावर जितेंद्र आव्हाड आक्रमक!
- भाजपचं खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणं चुकीचं – अशोक चव्हाण
- आगामी कल्याण- डोंबिवली महापालिका निवडणुकी बाबतीत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये महत्वाचा निर्णय
- भारत ४० वर्षानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) सत्राचे आयोजन करणार!
- चोरो को सारे नजर आते है चोर! एकनाथ खडसेंचा गुलाबराव पाटलांना खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

