ठाणे – कर्नाटकमधील हिजाब वाद सध्या देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. उडुपीमधील एका महाविद्यालयाने हिजाब घातलेल्या मुस्लीम मुलींना महाविद्यालयात प्रवेश नाकारल्यानंतर त्यावरून देशभर राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे.
केंद्र सरकारने Ministry of Dress Design नेमावे, असा खोचक सल्ला आव्हाड यांनी केंद्र सरकारला दिला आहे.