Share

‘मी पुन्हा येईन’साठी किती रडीचा डाव खेळणार? रोहिणी खडसेंची फडणवीसांवर खोचक टीका

Published On: 

मुंबई : कालपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली होती. पावसाळी अधिवेशनाचे दोन्ही दिवस वादळी ठरले. काल भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्यापासून भाजप आमदारांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता. आज तर विधीमंडळाच्या आवारात भाजपने अभिरूप विधानसभा थाटत वेगळं कामकाज केलं. यावर देखील तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत माईक व स्पीकर जप्त करण्यास सांगितले.

यानंतर देखील भाजपने आपलं बाहेरील कामकाज चालूच ठेवले. यासह भाजप नेत्यांनी महाविकास आघडी सरकारवर हल्लाबोल केला होता. ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच तास ही प्रतिविधानसभा चालली. ‘आम्ही या प्रतिविधानसभेतून सरकारचा बुरखा फाडला आहे. सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहे. शेतकरी, विद्यार्थी, मराठा तरुण, ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील,’ असं भाष्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी भाष्य करत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘ ‘मी पुन्हा येईन’साठी किती रडीचा डाव खेळणार? सभागृहात न जाता बाहेर शो बाजी करुन काय मिळविणार?,’ असा सवाल करत रोहिणी खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!