मुंबई : केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात गेल्या सात महिन्यांहून जास्त काळ दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे. आता केंद्राच्या या कायद्यामध्ये राज्य सरकारने सुधारणा करुन नवीन कृषी विधेयक सभागृहाच्या पटलावर ठेवलं आहे. त्या आधी आज सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे.
हे विधेयक सभागृहाच्या पटलावर मांडण्यात आले आहे. त्यावर आता सर्व क्षेत्रातून अभिप्राय मागवण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यात आपण सुधारणा करणार आहोत, त्याचा अभिप्राय घेण्यासाठी आपण दोन महिन्याचा कालावधी देत आहोत असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
तर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. शेतकरी हे देशाचे अन्नदाते आहेत. शेतकऱ्यांचे हे आंदोलन गेल्या ७ महिन्यांपासून सुरू आहे. दोन-चार दिवसांचे आंदोलन किती त्रासदायक असते याची आपल्याला कल्पना आहे. हे अन्नदाता असलेले शेतकरी शत्रू आहेत का, की ते पाकिस्तानातून आले आहेत, असा असे सवाल करत आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना आपापल्या घरी पाठवण्यासाठी कितीसा वेळ लागतो, असे भुजबळ म्हणाले.
तसेच एक आत्महत्या झाली तर आपण संवेदना प्रगट करतो पण दिल्लीतील आंदोलनात आतापर्यंत 200 शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. पण दुर्दैवाचा भाग म्हणजे मंत्री यायचे, चर्चा करायचे आणि निघून जायचे, अशा शब्दांत भुजबळ यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या
- भाजप अडचणीत असताना मुंडे भगिनी कोठे आहेत? विविध चर्चांना आले उधाण
- ‘१२ आमदारांच्या निलंबनाविरोधात हायकोर्टात जाणार’, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची माहिती
- अजित पवारांची मोठी घोषणा! राज्यातील विविध विभागातील १५ हजार ५०१ रिक्त पदे भरणार
- ‘चिंधीचोर भास्कर जाधव स्वतःच्या घरात बाहेरून कडी लावून झोपतो, त्याला मुंगीही मारणार नाही’
- ‘सर्व केंद्राने करायचे, तर मग तुम्हाला भजी-वडे तळायला बसवलंय काय?’, फडणवीसांचा हल्लाबोल


