Share

‘…अन्यथा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही’; बावनकुळेंचा इशारा

Published On: 

नागपूर : कालपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाचा कालचा दिवस खूप वादळी ठरला. कालच्या अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली होती.

तर, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विरोधकांचा गोंधळ कायम असून भाजपने सभागृहाबाहेर अभिरूप विधानसभा भरवली होती. महाविकास आघाडी सरकारने आरक्षण, शेतकऱ्यांचा प्रश्न, कोरोना काळातील भ्रष्टाचार आदी महत्वाच्या मुद्द्यांना बगल देत केवळ वेळ मारून नेण्यासाठी लोकशाहीला कुलूप लावून अधिवेशन केल्याची टीका भाजपने केली होती.

दरम्यान, १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्यासाठी भाजप कार्यकर्ते राज्यातील विविध शहरांमध्ये आंदोलन करत आहे. आज नागपुरात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं. महाविकास आघाडीचा प्रतिकात्मक पुतळा देखील जाळण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना, ‘भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन मागे घेतलं नाही तर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही,’ असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.

पुढे ते म्हणाले, ‘महाराष्ट्र सरकारने विधानमंडळाचा वापर करुन जुलूमशाही केली, हुकूमशाही केली आणि 12 आमदारांना निलंबित केलं. महाराष्ट्र सरकारने विधीमंडळाचा वापर राजकीय कामांसाठी केला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र रोष आहे. राज्यातील दीड हजार ठिकाणी कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. जोपर्यंत त्या 12 आमदारांचं निलंबन रद्द होत नाही तोपर्यंत राज्यात आंदोलन सुरु राहील. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन ठराव घेतला आहे. विधान मंडळाचा वापर राजकारणाकरिता केला आहे.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!