Share

व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा, चाकूचा धाक दाखवत पावणेचार लाखांचा मुद्देमाल लंपास

Published On: 

औरंगाबाद : पहाटेच्या वेळी घराचा दरवाजा वाजवत, त्यानंतर घरात प्रवेश घेत, कपडे व्यापाऱ्याच्या वृद्ध आईसह मुलीला चाकूचा धाक दाखवत. घरावर दरोडा टाकल्याची घटना रविवारी पैठण येथील भवानीनगर येथे घडली. यात व्यापाऱ्याचा तब्बल पावणेचार लाखाचा माल चोरट्यांनी लंपास केला. अनिल संतूमल पंजवाणी, वय- ४५ वर्ष असे कपडा व्यापाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती वरून, पंजवानी हे आपल्या कुटुंबासह भवानीनगर येथे राहतात. त्यांची बसस्थानकाजवळ कपड्याची दुकान आहे, हि दुकान ते त्यांच्या पत्नीसह चालवितात. शनिवारी रात्री ते नित्याप्रमाणे ९.३० वाजता दुकान बंद करून घरी आले. त्यांनी दुकानातून व्यवसायाचे १० हजार रुपये घरी आणले. त्यानंतर त्यांनी ते १० हजार रुपये हॉल शेजारील बेडरूम मधील कपाटात ठेवले. त्याकपाटात आधीच रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागिने होते.

त्याच बेडरूम मध्ये पंजवानी यांची आई आणि मुलगी झोपले बाकी सर्व त्यांच्या बेडरूम मध्ये झोपले. पहाटे पावणेचारच्या सुमारास कपाट तोडन्या सारखा आवाज आल्याने, पंजवानी हे उठले. ते त्यांच्या बेडरूमचा दरवाजा उघडून पाहण्यासाठी गेले असता त्यांच्या बेडरूमला बाहेरून कडी लावण्यात आली होती. त्यांनी आरडा ओरड करताच चोरटे मागच्या भिंतीवरून उड्या मारून पळून गेल्याचे त्यांनी खिडकीतून पहिले.

त्यानंतर वरच्या मजल्यावर राहणारे त्यांचे भाऊ आणि पुतणे खाली आहे. त्यांनी तत्काळ त्यांची आई आणि मुलगी झोपलेल्या रूम मध्ये प्रवेश केला तेंव्हा त्या दोघी खूप घाबरलेल्या होत्या. तसेच कपाट तुटलेल्या अवस्थेत होते आणि सर्व समान देखील असत व्यस्त होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या आईला विचारणा केली असता. दरवाजा वाजवत घरात घुसून त्यांना चार लोकांनी चाकूचा धाक दाखवत. कपाटातील रोखरकमेसह सोन्या चांदीचे दागिने मिळून ३ लाख ७० हजार रुपयांचा माल लुटून नेला . त्यानंतर पंजवानी यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!