Share

आज लॉकडाऊन होणार? औरंगाबादकरांचा जीव टांगणीला

Published On: 

औरंगाबाद : सध्या शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रुग्णांचा आकडा दिवसाला चारशेचा टप्पा ओलांडत आहे. निश्चितच प्रशासन यावर प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना करणार आहे. शनिवारी एका वृत्तवाहिनीने आणि काही माध्यमांनी सोमवार पासून लॉकडाऊन होणार असल्याचे वृत्त प्रसारित केले, त्यानंतर नागरिक आणि प्रशासनाची एकच धांदल उडाली, मात्र त्यानंतर प्रशासनाने मात्र लॉकडाऊन जाहीर केले नसल्याचे स्पष्ट केल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला. परंतु, या वृत्तामूळे सोमवार पासून लॉकडाऊन होणार अशी चर्चा जोरदार रंगली आहे.

रविवार (७) रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या ‘देवगिरी’ या निवासस्थानी सर्व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत लॉकडाऊन लावायचा की अजून इतर पर्यायांची चाचपणी करायची याबाबत निर्णय होणार आहे. तसेच लॉकडाऊन आवश्यक आहे का? रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागापूरते लॉकडाऊन करावे का, कोणते उद्योग, व्यवसाय सुरू ठेवावे, बससेवा, सिनेमागृह, मैदाने याबाबत काय निर्णय घ्यावा हे या बैठकीत ठरणार आहे.

या बैठकीनंतर संध्याकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी पत्रकारांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत लॉकडाऊन होणार की, नाही हे निश्चित कळणार आहे. मात्र तोपर्यंत सामान्य औरंगाबादकरांचा जीव टांगणीला लागला आहे. तर याच पार्श्वभूमीवर अनेकांनी मागील लॉगडाऊनचा अनुभव पाहता गरजेच्या वस्तू खरेदी करुण ठेवल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!