हिंगोली : कोराना रुग्णांचा वाढती संख्येचा कहर थांबता थांबत नाही. संचारबंदी तसेच लॉकडाऊन असताना देखील विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांसाठी आरोग्य विभाग तसेच पोलिस तसेच जिल्हा प्रशासनाने रस्त्यावर फिरणाऱ्यांचे कोराना चाचणी करण्याचे ठरवले होते. तर चाचणी सुरु केल्यावर शहरातील रस्ते सामसूम झालेले पहावयास मिळत आहे.
हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या वतीने विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा दुसऱ्या दिवशी मोहिम राबवण्याचे काम जोरात सुरु होते. या वेळी पाच जण कोराेना पॉझिटिव्ह आल्याचा प्रकार चाचणीच्या माध्यमातून समोर आला आहे. कोराेना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हिंगोली शहरासह जिल्हाभरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले. या काळामध्ये नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दुपारी हिंगोली – अकोला बायपास रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळुन आले. या वेळी अँटिजन तपासणी पथक स्थापन केले.
या पथकाकडून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पकडून अँटिजन चाचणी करण्यात येत आहे. या वेळी विनाकारण फिरणाऱ्या १०० नागरिकांची चाचणी करण्यात आली. या मधील पाच जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तर या पाचही जणांना पुढील उपचारासाठी कोराेना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार करण्यात येत आहेत. या वेळी शहरातील सर्व मुख्य रस्त्यावरील चौकाचौकामध्ये हे अँटिजन तपासणी करणारे पथक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे या पथकाला दुरुन बघताचा विनाकारण फिरणारे नागरिक मात्र घाबरुन पुन्हा घरचा रस्ता धरत असताना पहावयास मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्राने घोषणा केली ४० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची अन् दिले २६ हजारच; मंत्री शिंगणेंची माहिती
- ‘ठाकरे सरकारमधील नेते श्रेयासाठी हपापलेले, त्यामुळेच शिवसेना आणि काँग्रेसचे पित्त खवळले’
- महिलेचा छळ करणारा संजय राऊत हा विकृत माणूस, त्यांना अटक झालीच पाहिजे – निलेश राणे
- ‘रजनी सर म्हातारे होत आहेत म्हणून…’ जडेजाच्या कामगिरीनंतर धोनीचे ट्विट व्हायरल
- इशारा काय देता ? बदनामीचा खटला दाखल कराच; मुश्रीफांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान


