Share

विजय हजारे करंडक स्पर्धेतील चमकदार कामगिरीनंतर ऋतुराज गायकवाडची मोठी प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) विजय हजारे करंडक स्पर्धेत आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. गायकवाडने या स्पर्धेत त्याने खूप धावा केल्या असल्या तरी त्याचा संघ बाद झाला आहे.

ऋतुराज गायकवाडने विजय हजारे करंडक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याने चार जबरदस्त शतके झळकावली आणि आपल्या संघासाठी जबरदस्त खेळी खेळली. मात्र, असे असतानाही महाराष्ट्र आपल्या गटात तिसऱ्या क्रमांकावर राहिला. महाराष्ट्राने पाच पैकी चार सामने जिंकले पण साखळी फेरीतून ते बाहेर पडले.

मी फक्त प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करत आहे – ऋतुराज गायकवाड

ऋतुराज गायकवाड यांच्या मते ते केवळ त्यांच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करत आहेत. एका वृत्तसंशेसी संवाद साधताना ऋतुराज गायकवाड म्हणाला, ‘माझ्या यशाचे कोणतेही रहस्य नाही. मी फक्त माझ्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करत आहे आणि जास्त विचार करत नाही. मात्र, आमच्या संघाने प्रगती केली असती, तर मला माझ्या कामगिरीचा अधिक आनंद झाला असता. व्यक्तिशः ही एक मोठी उपलब्धी आहे आणि मला माझा आणि माझ्या संघाचा अभिमान आहे.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाडची बॅट जबरदस्त बोलली. त्याने महाराष्ट्रासाठी सलग तीन आणि एकूण चार शतके झळकावली. गायकवाडने मध्य प्रदेशविरुद्ध 136, छत्तीसगडविरुद्ध नाबाद 154, केरळविरुद्ध 124 आणि चौथ्या सामन्यात नाबाद 100 धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!